लॉक डाउन, दिवस २१ ( Lock down Day #21)

Tags

,

लॉक डाउन, दिवस २१

मी २१ दिवस हा लॉक डाउन ब्लॉग लिहायचे ठरवले होते त्याचा हा शेवटचा दिवस !

ह्या लॉक आऊट ने आपल्याला काय काय शिकवले ?

  • माणसाने कितीही प्रगती केली तरी काही वेळा निसर्ग नक्की माणसावर मात करतो. ते करताना तो जात , धर्म , देश अशा कुठल्याच सीमा पाळत नाही.
    -स्वछतेचे महत्व ! इतक्या वेळा कधी हात धुतले होते का कधी !!
  • स्वतः चा आणि सामाजिक अहंकार कमी झाला. सगळे घरी राहून घरातली सगळी कामे करायला लागली. मोठे नट आणि प्रतिष्ठित व्यक्ती पण घरातील काम करतानाचे फोटो share करू लागले. जे पूर्वी त्यांनी कधीच केले नसते.
  • सगळे जण घरी जुने आणि नवे पदार्थ करायला लागले , ते share करायला लागले आणि आवडीने खायला लागले.
  • माणसाला जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज लागते ह्याची जाणीव नक्की झाली.
  • आपण सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमी नावे ठेवत आलो पण Corona च्या काळात त्यांचे महत्व आणि त्यांनी मनावर घेतले तर ते काम नक्की करू शकतात हे अनुभवले.
  • जगण्याचे स्वातंत्र म्हणजे काय ? जे आपण गृहीत धरले आहे. लॉक डाउन मध्ये माणूस सोडून सर्व पक्षी आणि प्राणी जगण्याचे स्वातंत्र अनुभवत होते.
  • Internet ने नसते तर लॉक डाउन मध्ये राहणे खूप अवघड झाले असते. Internet हि आता जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.

अजून लॉक डाउन बाकी आहे. अजून पण नवीन गोष्टी नक्की कळतील.

सगळ्यांनी धैर्याने आणि संयमाने कॉरोना चा सामना करूया.

नवीन विषयावर नवीन ब्लॉग परत कधीतरी !!

लॉक डाउन, दिवस २० ( Lock Down Day #20)

Tags

, ,

लॉक डाउन, दिवस २०

सोमवर – आज काम परत सुरु. दोन दिवसाच्या सुट्टी नंतर. मॉर्निंग वॉक झाला. थोडे बिल्डिंग खाली आणि थोडा वेळ बिल्डिंग च्या गल्लीत चाललो. त्यानंतर काही योगासने. माझा मित्र शरद डुंबरे रोज सगळ्यांना गेले २ आठवडे दरोरोज एक योगासन पाठवत होता. आज त्याचा अखेरचा दिवस होता.

ब्रेकफास्ट ( धिरडे) झाल्यावर माहेश्वर दुकानात Gullybuy चे ऍप इन्स्टॉल करून आलो. उद्या त्याला प्रात्यक्षिक दाखवायचे आहे. २ ते ५ ऑफिस चा झूम कॉल झाला.

संध्याकाळी थोड्या वेळ गॅलरी त बसलो होतो. आज जरा शेजारच्या आणि समोर च्या बिल्डिंग मधील काही जण खाली रस्त्यावर चालत होते. थोड्या गप्पा पण मारत होते, अर्थात अंतर ठेवून. सकाळी पळत पण होते. कोथरूड मधील लोकांनी लॉक डाऊन कडक पाळल्या मुळे फक्त १ च केस आहे. हे लॉक डाउन १ महिना कडक चालू असल्याने लोक जरा आता कंटाळले असतील.

अजून २ आठवड्याचे लॉक डाउन वाढवले. त्यांनी corona चा प्रसार खूप कमी होईल पण corona बाधितांचा आकडा काही शून्य होणार नाही, अजून ६ महिने जरी लॉक डाउन वाढवले तरी. आपल्याला, भारताला आणि सर्व जगाला, कॉरोना बरोबर कसे राहायचे ते ठरवावे लागेल.

दुपार चा मेनू : सांडगे पापडे ची आमटी; रात्री : थालपीठ .

कदाचित उद्या ब्लॉग चा अखेरचा दिवस. उद्या २१ दिवस होतील. ब्लॉग ३० तारखे पर्यंत वाढवायचा कि थांबवायचा ? तुम्हाला काय वाटते?

लॉक डाउन, दिवस १९ ( Lock Down Day # 19)

Tags

, ,

लॉक डाउन, दिवस १९

आज रविवार, खरे तर सुट्टीचा दिवस पण लॉक डाऊन मुळे काही वेळा कळतच नाही कि कुठला दिवस आहे ते. सकाळी चालणे आणि निवांत पेपर वाचून झाले. नंतर ब्रेकफास्ट – कॉर्न फ़ोहे.

सकाळी मित्रांबरोबर झूम कॉल झाला. पण झूम कॉल वर कसे बोलायचे ते कळत नसल्याने सगळे एकदम बोलतात आणि मग सगळा कल्लोळ होतो. पण एकमेकांचे चेहरे दिसतात हे काही कमी नाही. इंटरनेट आणि टीव्ही यांनी हे लॉक डाउन थोडे सुखावह केले आहे. पूर्वी च्या काळात (१९१८ फ्लू ची साथ) कसे केले असेल. तेंव्हा तर lights पण नव्हते.

दुपारी मागवलेले सामान आले. त्याला Gullybuy च्या किराणा ऑर्डर करण्याच्या ऍप बद्दल सांगितले. उद्या जमले तर त्याला प्रात्यक्षिक दाखवेन. या परीस्थितीत किराणा माल विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला हे ऍप खूप उपयोगी होईल. घरी बसून लोकांना किराणा माल ऑर्डर करता येईल आणि सामान बांधून तयार झाले कि जाऊन लगेच घेता येईल.

महाराष्ट्र सरकारने जरी लॉक डाउन वाढवला तरी केन्द्र सरकार ने तशी घोषणा अजून केली नाही. मला वाटते कि हा निर्णय राज्यांवर सोडवावा. सर्व राज्य त्यांच्या जिल्हा ची विभागणी हिरवा,ऑरेन्ज आणि लाल अशी विभागणी करत आहेत. केन्द्र सरकार नि मार्गदर्शक तत्वे घालून द्यावीत कि कुठल्या प्रकारच्या जिल्ह्यात काय काय गोष्टी करता येतील. केन्द्र सरकार ने इंटरस्टेट वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवांसाठी करावी.

दुपार चा मेनू : गवार भाजी आणि पोळी, रात्री : नूडल ( नितीश ने केल्या) आणि वांग्याचे चाइनिज पद्धतीचे काप.

लॉक डाउन मुळे मला प्रश्न पडलाय कि हा ब्लॉग पण ३० तारखे पर्यंत वाढवायचा कि थांबवायचा ? तुम्हाला काय वाटते? तुमच्या उत्तराची वाट बघतोय.

लॉक डाउन, दिवस १८ ( Lock Down Day # 18)

Tags

, ,

लॉक डाउन, दिवस १८

आज शनिवार, आमचा टेकडी चा दिवस. गेले २-३ शनिवार corona मुळे टेकडी बंद. बहुतेक मे मध्ये कधी तरी सुरु होईल.

आज चतुर्थी असल्याने उपवास मेनू. सकाळी खिचडी. जेवायला उपवास थालपीठ. मी आणि नितीश उपवास करत नाही पण आज उपवासा चे खाणे जरा चेंज होईल आणि परत आमच्या दोघांसाठी परत वेगळे करायला नको, म्हणून जेवायला पण उपवास च! रात्री मी मटार रस्सा केला. खूप मस्त झाला होता.

काल वाटल्याप्रमाणे आता लॉक डाउन ३० एप्रिल पर्यंत वाढवला. गरजच आहे तशी. उद्धव ठाकरे खूप च चांगले बोलले. शांत पण खंबीर, थोडी फुंकर थोडी धमकी, आणि कुठंही नाटकी पणा नाही.

आज ३ झूम कॉल झाले. विद्या चा तिच्या मैत्रिणीनं बरोबर, माझा माझ्या मित्रां बरोबर आणि नितीश चा बहीण आणि भावानं बरोबर. माणुस कसा नवीन परिस्थितीबरोबर कशी तडजोड करतो नाही !

लॉक डाउन मुळे मला प्रश्न पडलाय कि हा ब्लॉग पण ३० तारखे पर्यंत वाढवायचा कि थांबवायचा ? तुम्हाला काय वाटते?

लॉक डाउन, दिवस १७ ( Lock Down Day # 17)

Tags

, ,

लॉक डाउन, दिवस १७

आज सकाळी नेहा आणि योगर्षि चा फोन आला होता. ते दोघे एकत्र आहेत त्यामुळे बरे आहे. त्यांनी आज डोसा मागवला होता पण त्याला खूप वेळ लागल्यामुले तो येईपर्यंत त्याची मजाच गेली. आज पटेल उघडे असल्यामुळे त्यांना सामान मिळाले आणि डोशाचे पीठ पण.

सकाळी थोडे चालून नंतर थोडा व्यायाम. आमच्या इथले काही रस्ते बंद केल्याने दूध वाला उशिरा आला. त्याला बराच वळसा घालून यायला लागले.

दुपारी थोडे काम आणि नंतर संध्याकाळी अझूल हा नेहा आणि योगर्षि ने दिलेला गेम खेळलो. संध्याकाळी विद्या चा तिच्या मैत्रिणीनं बरोबर झूम कॉल झाला आणि रात्री मी पण माझ्या मित्रांच्या झूम कॉल मधे ५ मिनिटे समाविष्ट झालो.

ब्रेक फास्ट : फोडणीची पोळी ; दुपारी : डाळ वांगे ची आमटी आणि बीट भाजी ; संध्याकाळी : पिठलं भाकरी

अजून ४ दिवस ! पण कदाचित जास्त पण !! मनाची तयारी केली पाहिजे.

लॉक डाउन, दिवस १६ ( Lock Down Day # 16)

लॉक डाउन, दिवस १६

आज सकाळीच किराणा सामान आणले कारण आता दुकाने फक्त सकाळीच उघडी राहणारेत. खरं तर या निर्णयामुळे सकाळी थोडी गर्दी होणार पण लोकं उगाचच पिशवी घेऊन सामान आणण्याचे निमित्त करून फिरतात त्याला अटकाव करण्यासाठी असे केले असावे. दुकानांत खरेदी करताना पण पण लोकं Social डिस्टन्स पाळत आहेत.

नितीश च्या लॅपटॉप चा स्क्रीन बिघडला. आता लॉक डाउन मध्ये काही करता येणार नाही. घरात जरी काही बिघडले तरी आत्ता दुरुस्तीला कोणीही मिळणार नाही.

Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज जरा कर्फ्यूची कडक अंमलबजावणी सुरु केली. त्याची गरज आहे corona चा पुण्यातील वाढता आकडा लक्ष्यात घेता. पुण्याचा लॉक डाउन अजून १५ दिवस तरी वाढेल असे वाटते. माझ्या मते सरसकट इंडिया चा लॉक डाउन वाढवण्यापेक्षा ,जिथे केसेस आहेत तिथेच वाढवावा. ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये शून्य केसेस आहेत त्या जिल्ह्यात लॉक डाउन उठवावा पण जिल्हाच्या सीमा बंद करून.

ब्रेक फास्ट : फोडणीची पोळी ( काल रात्री विद्याने मुद्दाम पोळ्या केल्या, आज फोडणीची पोळी करण्यासाठी ); दुपारी : पोळी , भाजी आणि उसळ; संध्याकाळी : पिझ्झा ( कसा तरी लोकल बेकरी मध्ये बेस मिळाला)

अजून ५ दिवस !

लॉक डाउन, दिवस १५ ( Lock Down Day #15)

लॉक डाउन, दिवस १५

सकाळी हल्ली लवकरच जाग येती. ५.३०/६ ला. नंतर चहा पिऊन ७ पर्यंत पेपर वाचून होतो आणि मग त्यानंतर खाली पार्किग मध्ये चालणे. घरी आल्यावर १२ सूर्य नमस्कार आणि नंतर दुसरा चहा ! ९:३० च्या दरम्यान ब्रेकफास्ट आणि नंतर १० वाजाता कामाला सुरवात.

आज बुधवारी दुपारी २-५ या वेळात ऑफिस चा झूम कॉल झाला. त्यामध्येच ४ वाजता चहा. काम झाल्यावर थोडा वेळ सगळे जण बाल्कनी मध्ये बसलो आणि नंतर “आणि काय हवेय” हि MX प्लेअर वर सिरीयल बघितली. उमेश कामत आणि प्रिया बापट ची हि web सिरीयल. आजचा पार्ट “पुरण पोळी” एकदम मस्त होता.

सगळे जग corona शी झगडत असताना आज corona जिथून सुरु झाला ते वूहान शहर पूर्ण corona मुक्त झाले. आता तिथे सगळं नेहमी सारखे सुरु झाले.

ब्रेक फास्ट : अप्पे , दुपारी : पोळी भाजी आणि संध्याकाळी : वरण फळं

अजून ६ दिवस !

लॉक डाउन, दिवस १४ ( Lock Down Day # 14)

लॉक डाउन, दिवस १४

आज पहिला सुखद धक्का बसला तो पेपर आलेला पाहून. आज पासून पेपर रोज येईल अशी आशा करूया. सकाळच्या “लॉक डाउन मॉर्निंग वॉक” मध्ये आज संजीव अभ्यंकर चे शास्त्रीय संगीत ऐकले. काल राहूल देशपांडे चे ऐकले होते. शास्त्रीय संगीत ऐकायला सकाळची किंवा रात्री ची वेळ एकदम मस्त.

आज नितीश चे NYU युनिव्हर्सिटी , न्यूयॉर्क ला Phd ( Computer Science ) साठी जायचे नक्की झाले. त्याचा आवडीचा विषय त्याच्या आवडीच्या युनिव्हरीसाटीला त्याच्या आवडीच्या शहरात मिळाला !! योगर्षि आणि नेहा च्या जवळ पण आहे ही अजून एक जमेची बाजू.

आपण आपले स्वातंत्र गृहीत धरलेले असते पण आता सगळ्यांना corona मुळे घरीच राहायला लागल्यावर त्याचे महत्व नक्की सगळ्यांना कळाले असेल. महाराष्ट्रा मध्ये corona चा खूप प्रसार होतोय त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. मुंबई, पुणे , ठाणे इथे १-२ आठवड्यासाठी लॉक डाउन वाढेल असे वाटते आणि तशी गरज पण आहे.

ब्रेक फास्ट : ब्रेड ऑम्लेट , दुपारी : भाकरी आणि वांग्याची भाजी आणि संध्याकाळी : पनीर रोल्स ( नितीश ने केले)

अजून ७ दिवस !

लॉक डाउन, दिवस १३ ( Lock Down Day # 13)

लॉक डाउन, दिवस १३

आज सोमवार , कामाचा दिवस. त्यामुळे १० ते ५:३० पर्यंत काम झाले पण त्यामध्येच मित्रां बारोबर झूम कॉल पण झाला. त्या आधी पार्किंग मध्ये ३ kms चालणे. आज पण पेपर आला नाही.

Corona ला मात करण्यासाठी सगळं जग एकवटलंय. कित्येक ठिकाणी लसी वर काम चालू आहे तर काही ठिकाणी त्यावर औषध कुठले याचा प्रयोग चालू आहे. मानव जाती वर आलेल्या या संकटावर जगात केवढे शास्त्रज्ञ एकाच वेळी काम करतायत ! हे एक रेकॉर्ड च असेल. Corona ने पण दाखवून दिले कि या व्हायरस ला जाती , भाषा , देश , गरीब , श्रीमंत अशा सीमा नाहीत. कुठल्या राष्ट्रा ने कितीही प्रगती केली तरी निसर्गाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. आपण नक्की यातून बाहेर येऊ पण संयम आणि आशा या गोष्टींची खूप गरज आहे.

ब्रेक फास्ट : रवा डोसा , दुपारी मटकी उसळ आणि संध्याकाळी भेळ

अजून ८ दिवस !

लॉक डाउन, दिवस १२ ( Lock Down Day # 12)

लॉक डाउन, दिवस १२

आज परत पेपर बंद झाला. खूप सोसायटी मध्ये पेपर वाल्यांना आत येऊ देत नाहीत त्यामुळे वितरकांच्या युनिअन ने बंद ठेवला आहे. आज सकाळीच भाजी आणली. बरीच चांगली मिळाली पण जरा महाग. आठवड्याची आणून टाकली म्हणजे सारखे सारखे जायला नको.

सध्या विद्याला घरातले काम खूप पडतेय म्हणून मी आणि नितीश पण मदत करतो. नितीश रोज केर काढतो तर मी कपडे वाळत घालतो आणि डिश वॉशर उनलोड करतो.

रात्री ९ वाजता आम्ही पण लाईट घालवून मेणबत्त्या पेटवल्या होत्या. मेणबत्त्याचे काही एव्हडे पटले नव्हते पण मोदी सरकार, ठाकरे सरकार, सर्वं शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणारे ( भाजी, दूध , किराणा , इत्यादी ) हे खूप काम करत आहेत. त्यांना सन्मान म्हणून त्यात सहभागी झालो

आज ब्रेकफास्ट मेनू : कांदे फ़ोहे , दुपारचे जेवण : पनीर काजू मसाला आणि पराठे , रात्री : ग्रिल सँडविच ( मी केले) आणि सूप

अजून ९ दिवस !!