सकाळी ९ वाजता ग्रेईं ( Grein ) वरून मेलक ( Melk)  ला जायला निघालो. हा पल्ला तसा लांबचा – ५६ किलो मीटर्स चा.  जाताना विरुद्ध दिशेने येणारे वारे  आणि तळपता सूर्याचा सामना करायला लागला आणि त्यातून थोडा घाट !   जवळ जवळ  २५ किलो मीटर्स  नंतर “यबबस अन  डर  दोनाउ” ( Ybbs an der Donau) ला थोडी विश्रांती घेऊन पुढे मार्गक्रमण चालू केले.  आम्ही जेवायला एका कॅफे मध्ये थांबलो. कॅफे च्या मालकाला आमच्या कडे बघून कपाळाला आठ्या पडल्या. सगळ्या ट्रिप मध्ये हा अनुभव एवढा चांगला नव्हता. त्याला बहुतेक वाटले कि आता आम्ही आमच्या बॅग्स उघडून त्याच्या कॅफे मध्ये आमचे खाणे खात बसणार !!  आम्ही तिथे ice क्रीम आणि डोनट्स घेतले, पण जरा बळजबरीनेच !!  Melk मध्ये आमच्या बोटी जवळ पोचायला ४-५ वाजले. आम्ही बोटीवर पोचल्या वर लगेचच बोट  तुलन ( Tulln ) ला रवाना झाली.

बोटी वरील आमचे सगळे खाणे अफलातून होते. सकाळी मेगा ब्रेकफास्ट आणि नंतर रात्री मल्टि कोर्स  डिनर. Tea आणि coffee कितीही वेळा घेऊ शकता !!

34a0d392-930f-4dcb-b3a4-21bc3b25fafb192aa3a9-f682-42d8-ae55-3f1e68ced59aIMG_3946IMG_3959

Advertisements