Tags

आज वेताळे च्या डोंगरावर १४ trees च्या वनीकरणाच्या प्रोजेक्ट ची पाहणी करताना एका गोष्टी ने लक्ष वेधले तो म्हणजे एक एकदम छोटासा झरा. एप्रिल च्या तडपत्या उन्हात बोडके डोंगर गवत वाळल्यामुळे पिवळे पडले होते आणि त्यात हा जिवंत झरा दिसला, म्हणून जास्त नवल वाटले. हा झरा डोंगारावरचे आदिवासी ( ठाकर ) पिण्याचे पाण्यासाठी वापरतात. झरा इतका छोटा आहे कि एक बादली भरायला २ तास तरी सहज लागतील. हे आदिवासी लोक वाटी वाटी ने बादली भरतात ! एवढ्या कष्टाने पाणी भरल्यावर नक्कीच काटकसरीने वापरात असतील.

कल्पना करा की आपल्यावर अशी वेळ अली तर ? आपण तर पाण्याला गृहीतच धरले आहे. घरात २४ तास पाणी पाहिजे. पुण्याचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक माणूस सरासरी २००-२५०० लिटर्स पाणी वापरतो . आपल्याला पाणी मिळवायला काहीच कष्ट लागत नाहीत कदाचित त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळात नाही. आपण सर्वानी विचार केला पाहिजे की पाणी कमीत कमी कसे वापरता येईल.

नक्की विचार करा ! आपण पाणी वाचवले नाही तर काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढयांना नक्कीच संकटाचा सामना करायला लागेल.